Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRA

Parbhani – माजी आमदार बोर्डीकरांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे भाजपाच्या नेतेमंडळींचा सूर

परभणी : महानगर पालिकेसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, उमेदवारांच्या मागे भक्कम पाठबळ उभे करावे व पक्षास यश मिळून द्यावे, असा सूर भारतीय जनता पक्षाने आयोजीत केलेल्या एका सोहळ्यातून नेतेमंडळींनी व्यक्त केला.

परभणीतील बी.रघूनाथ सभागृहात ज्येष्ठ नेते बोर्डीकर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे अध्यक्षस्थानी तर मीनाताई बोर्डीकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते विजयराव वरपूडकर, संतोष मुरकुटे, जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, विलास बाबर, डॉ.विद्या चौधरी, अ‍ॅड.व्यंकटराव तांदळे, शिवाजीराव मव्हाळे, सुनिल देशमुख, सुरेश भुमरे, राधाजी शेळके, आदी व्यासपीठावर विराजमान होते.

याप्रसंगी भाजपाच्या नेतेमंडळींनी बोर्डीकर यांना शुभेच्छा देते वेळी बोर्डीकर यांनी पक्षाचे, निवडणुकांचे नेतृत्व स्विकारावे व पक्ष बांधणीसह निवडणुकांमधून मोठे यश पटकाविण्याकरिता पाठबळ उभे करावे, असा सूर व्यक्त केला. बोर्डीकर यांनी सत्कारत्तर भाषणात पक्ष बांधणीकरिता निश्‍चीतच वेळ द्यावा लागले, असे नमुद करीत त्या शिवाय स्थानिक स्वराज्यसंस्था असो की सार्वत्रिक निवडणुकीत हमखास यश मिळविता येणार नाही, असे स्पष्ट केले. पुर्वी आणि आताच्या कामाच्या पध्दतीत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे हे बदल स्विकारले पाहिजेत. सर्वसामन्य नागरिकांच्या सुख, दुःखात आवर्जुन गेले पाहिजे. छोट्या-मोठ्या समस्याचे निकारण केले पाहिजे. त्याच बरोबर पक्षाची ताकद वाढविण्याकरिता ध्येय धोरणे सुध्दा रूजविली पाहिजे, असे नमुद केले. परभणी महागनरपालिकेच्या निवडणुकीत प्रबळ उमेदवार मिळत नाहीत, अशी खंत व्यक्त करीत बोर्डीकर यांनी कमकुवत उमेदवार लादून निवडणुका जिंकता येत नाहीत, असा इशारा दिला. प्रत्येक निवडणुकीत हमखास असे यश पटकाविण्याकरिता इच्छुकांना सर्वसामान्य माणुस केंद्रबिंदू करीत सामान्यांच्या सुख,दुःखात सहभागी व्हावे.सर्व घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading