Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘त्या’ प्रवाशाच्या मृत्यू प्रकरणी सर्व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे -संगीता तिवारी


पुणे : दिवाळीनिमित्त काल राज्याभरातील नागरिकांनी गावी जाण्यासाठी एसटी स्टॅंडसह रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी केली होती. याच गर्दीमुळे पुण्यातील रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत गाडीमध्ये चढणाऱ्या साजन बलदेवन या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी काल समोर आली होती.याप्रकरणी एवढी गर्दी झालीच कशी ?
किती तिकिटे विकली याचे रेल्वे प्रशासनाला भान नव्हते काय ? किती लोक येतील याची जाणीव झाली नाही काय ? जबाबदार आणि बेफिकीर राहिलेल्या सर्व रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि येथून पुढे याबाबत दक्षता घेतली पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी विभागीय व्यवस्थापिका रेणू शर्मा यांच्याकडे केली आहे
संगीता तिवारी म्हणाल्या,स्टेशन येथे दानापुर एक्सप्रेस ला झालेल्या चेंगरा चेंगरी मध्ये मृत पावलेल्या ३० वर्षी युवक साजन बलदेवन ह्याच्या कुटुंबाला रेल्वे प्रशासनाने २५ लाख रुपये आणि जखमी लोकांना ५ /५ लाख रुपये द्यावेत हि आमची मागणी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading