Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

Bigg Boss Marathi S4 – “या माणसापासून सांभाळून राहा…” – मेघा घाडगे

बिग बॉस मराठीची या आठवड्यातील चावडी चांगलीच रंगली. आरोप प्रत्यारोप तर बघायला मिळालेच पण, काही सदस्यांना आता जागं होण्याची गरज आहे असे देखील महेश मांजरेकरांनी सांगितले. तर योगेशला सक्त ताकीद मिळाली जर या पुढे कोणाचा बाप काढला तर घरामधून बाहेर काढेन. काही सदस्यांना पत्राद्वारे आपल्या व्यक्त करण्याची संधी बिग बॉस यांनी दिली. तेजस्विनीने अमृता धोंगडेसाठी तर प्रसादने योगेशसाठी पात्र लिहिले… तर अमृता देशमुखने प्रसादसाठी पत्र लिहिले तर किरण माने यांनी विकासाठी. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT चुगली बूथद्वारे आलेल्या चुगलीमुळे अपूर्वा अमृता धोंगडे वर चांगलीच भडकली, “आयुष्यात पुन्हा असं बोलीस तर खूप महागात पडेल” असे अपूर्वाने तिला बजावून सांगितले. तर दिवाळीनिमित्त काही स्पेशल भेटवस्तू सदस्यांनी एकमेकांना दिल्या. ज्यामध्ये त्रिशूलने योगेशला नारळ देऊन बाहेरचा रस्ता दाखवला, तर अपूर्व मिळाली काडेपेटी. तेजस्विनीला मिळाले रिमोट कंट्रोल.

VOOT आरोपी कोण मध्ये विकासला आरोपी ठरवले आणि शिक्षा देखील सुनावली. कारण देखील दिले का तो या आठवड्याचा आरोपी आहे, कारण किरण माने सांगतात तेच तो करतो. आणि तो क्षण आला जो कधीच येऊ नये असे घरातील प्रत्येक सदस्याला वाटत असते. मेघा घाडगे यांना घराबाहेर पडावे लागले. “अमृता देशमुख धन्यवाद मला चूक नसताना नॉमिनेट केलं… किरण माने तुमच्यामुळे मी बाहेर आले आहे. AV पहिली मी या माणसापासून सांभाळून राहा” घरच्यांना मेघा घाडगे यांनी दिला सल्ला

पुढच्या आठवड्यात कोण राहील ? कोण जाईल ? हे ठरवेल त्यांचा गेम. कोण होईल कॅप्टन ? कोण होईल नॉमिनेट ? कोण होईल सेफ ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading