Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भारताच्या दणदणीत विजयानंतर पुणेकरांची रस्त्यावर उतरून दिवाळी


पुणे: भारत – पाकिस्तान टी ट्वेन्टी विषवचशक स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत भारताने रोमहर्षक विजयाचा इतिहास रचला.
पुण्यातील एफसी रोडवर तरुणाई भारतीय संघाच्या विजयाचा आनंद करण्यासाठी रस्त्यावर एकवटल्याचे दिसून आले.
एफसी रोडवर मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. यामध्ये गुडलक चौकात तर भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी आसमंत दुमदुमन निघाल्याचे दिसून आले आहे. बराचवेळ एफसी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले. शेवटच्या क्षणापर्यत मॅच कोण जिंकणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. अखेर विराट कोहलीच्या खेळीनं भारताला विजय मिळाला.
दिवाळीत भारताने मॅच जिंकल्यानंतर सर्वत्र फटाके वाजण्यास सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच, उपनगरतही विजयाच्या उत्साहाचे वातावरण दिसून आले. अनेक रस्त्यांवरून तरुणाई हातात भारताचे झेंडे घेऊन घोषणा देत फिरताना दिसून आली. मॅच सुरु असताना मात्र रस्ते सामसूम झाले होते. मात्र विजयानंतर असंख्य नागरिक पुण्यातल्या प्रमुख रस्त्यांवर उतरले होते. आता खरी दिवाळी साजरी होणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी पुणेकरांनी दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading