fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेत वसुबारस व दीपोत्सव साजरा

पुणे : वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिपावली. या दिपावलीनिमित्त, शुक्रवार, दि. 21ऑक्टोबर 2022 रोजी टिळक रोड वरील डी.ई.एस. पूर्व प्राथमिक शाळेत वसुबारस व दीपोत्सव साजरा करण्यात आला.
आजच्या उपक्रमाचे आकर्षण म्हणजे वात्सल्याचे, उदारतेचे, समृद्धीचे प्रतीक म्हणजे प्रत्यक्ष गाय वासरू शाळेत आणण्यात आले होते. त्याची माहिती देण्यात आली. मुले,पालक, शिक्षकांनी हौसेने गायीची पूजा केली.
या निमित्ताने शाळेत मुलांनी रंगवलेल्या पणत्या प्रज्वलित करून आकर्षक रांगोळी काढून त्यावर लावल्या होत्या. आकर्षक दिव्याची रोषणाई केली होती. तसेच दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्व सजवून ठेवण्यात आले होते. मुलांचा आवडता किल्ला बनवण्यात आला होता. सर्व मुलांना पी पी टी द्वारे दिवाळ सणाची माहिती सांगण्यात आली. त्यांच्याकडून तयार करण्यात आलेले आकाशकंदील, पणत्या, शुभेच्छा कार्ड याचे वाटप केले. सर्व वातावरण मंगलमय झाले होते. मुलांना खाऊ व फराळाचे पदार्थ देऊन कार्यक्रमाचा समारोप झाला. हा सर्व उपक्रम माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली उत्साहाने पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading