fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

‘सिंहगड’ने पटकाविला ‘सरपोतदार करंडक’

पुणे –  बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन प्रसंगनाट्य स्पर्धेत ‘सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’च्या ‘खंजीर’ या प्रसंगनाट्याला पहिला क्रमांक मिळाला.

‘एमईएस कॉलेज ऑफ परफॉरर्मिंग आर्टस्’च्या ‘जुगार’ला दुसरा, तर ‘सिंहगड’च्या ‘परंपरा’ या प्रसंगनाट्याला तिसरा  क्रमांक   मिळाला. या वर्षी स्पर्धेचे विसावे वर्ष होते. बत्तीस महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे पुढीलप्रमाणे

सर्वोत्कृष्ट अभिनेता – 1) सोहम आठवले (इंडसर्च), 2) नील देशपांडे (स. प. महाविद्यालय), 3) ओमकार सरदेशपांडे (व्हीआयटी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – 1) श्रावणी धुमाळ (स. प. महाविद्यालय), 2) श्रृती देवधर (कावेरी कॉलेज), 3) श्रीनिधी पवार (सिंहगड)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – 1) वरद शिंदे (पीव्हीजी कॉलेज), 2) समर्थ खाडे (सिंहगड), 3) सौमित कारखानीस (गोखले इन्स्टिट्यूट)

प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री अक्षया देवधर, ऋचा आपटे, विनोद सातव यांनी परीक्षण केले.


प्रसंगनाट्य स्पर्धेत आपण थोड्या वेळात काय उत्तम देऊ शकतो, याचा कस लागतो. कमीतकमी वेळात जलद विचार करून उत्तम कल्पना पुढे नेता येते. महाविद्यालयीन वयात गमवायचे काहीच नसते. चुकांमधून अधिकाधिक शिकता येते, अनुभव मिळतो, स्वतःला घडविता येते. अनेकदा जोखीम घ्यायला आपण घाबरतो. ती घ्यायची तयारी ठेवा. वेगळा विचार करून काहितरी आश्चर्यकारक करा, तर प्रशंसा होऊ शकते, व्यावसायिक रंगभूमिवर यश मिळू शकते, असे मत दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading