‘चेस फॉर फ्रीडम’ च्या चॅम्पियनशिपमध्ये येरवडा तुरुंग संघाने कांस्यपदक जिंकले
पुणे: भारताचे प्रतिनिधीत्व करत, येरवडा कारागृह, पुणे येथील बुद्धिबळ संघाने जागतिक बुद्धिबळ महासंघ (एफआयडीई ) द्वारे कैद्यांसाठी आयोजित नुकत्याच पार पडलेल्या इंटरकॉन्टिनेंटल ‘चेस फॉर फ्रीडम’ ऑनलाइन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले. या कार्यक्रमात 46 देशांतील 85 हून अधिक संघांचा सहभाग होता. इंडियन ऑईलने, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने, “परिवर्तन – प्रिझन टू प्राईड ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धे” द्वारे सहभागी भारतीय संघांची निवड 20 तुरुंगातील कैद्यांना मधून केली . पुणे आणि प्रयागराज कारागृहातील संघ इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियन च्या अंतिम फेरी साठी पात्र ठरले होते तर तिहार जेलमधील महिला आणि किशोर संघ संबंधित श्रेणींमध्ये पात्र ठरले.
इंडियन ऑईलच्या “परिवर्तन- प्रिझन टू प्राईड ” ज्याची संकल्पना इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस.एम. वैद्य यांनी केली ,त्या उपक्रमाचा लाभ पात्रता स्पर्धेने घेतला, ज्यामुळे क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे देशभरातील तुरुंगातील कैद्यांना गुंतवून ठेवण्यात आणि त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत झाली . संघांचे अभिनंदन करताना वैद्य म्हणाले, “मी येरवडा संघाच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो . या चॅम्पियन्सना प्रशिक्षित करण्यासाठी पुढे आलेल्या इंडियन ऑईल स्पोर्ट्स स्टार्सचेही मी कौतुक करतो . अशा यशामुळे परिवर्तन सारख्या आगळ्या – वेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे आपल्या सभोवतालच्या समुदायाचे राहणीमान समृद्ध करण्यात मदत करण्याचा आमचा संकल्प दृढ होतो.”
तुरुंगातील कैद्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी “परिवर्तन- प्रिझन टू प्राईड” उपक्रमांतर्गत, इंडियन ऑईल भारतातील कारागृहांमध्ये बुद्धिबळ, बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि कॅरम यांसारख्या विविध खेळांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांची सुविधा पुरवत आहे . 15 ऑगस्ट 2021 रोजी लाँच झाल्यापासून, इंडियन ऑईलने 20 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशातील 37 तुरुंगांचा समावेश केला आहे, आणि 1750 हून अधिक कैद्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले आहे. या कैद्यांना पर्यंत पोहोचण्याच्या माध्यमातून सहभागींना उपकरणे आणि किटसह कोचिंग सुविधा पुरविल्या जात आहेत.
इंडियन ऑईलच्या प्रशिक्षकांमध्ये बुद्धिबळातील ग्रँडमास्टर्स ईशा करावडे, सौम्या स्वामीनाथन, पद्मिनी राऊत, एस एस गांगुली, आणि अभिजित कुंटे यांचा समावेश आहे; बॅडमिंटन मध्ये मंजुषा कंवर (माजी राष्ट्रीय चॅम्पियन), अभिन श्याम गुप्ता (अर्जुन पुरस्कारप्राप्त), आणि एस अरुण विष्णू (माजी राष्ट्रीय चॅम्पियन यांचा समावेश आहे ; तर टेनिस मध्ये रूश्मी चक्रवर्ती (माजी राष्ट्रीय चॅम्पियन) आणि कॅरममध्येआंतरराष्ट्रीय खेळाडू योगेश परदेशी, मोहम्मद. गुफ्रान, सुश्री काजल कुमारी आणि रमेश बाबू यांचा समावेश आहे
