पी हळद आणि हो गोरी असे नसते चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना टोला
पुणे:पुणे शहर आणि परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदी-नाल्यांचे स्वरूप आले होते, रस्त्यांवर आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे महापालिकेने पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला अव्यवस्थेची कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. अशी टीका अजित पवार यांनी काल भाजप वर केली.
मी अजित पवार यांना आवाहन करतो की दुसऱ्यांना बोट दाखवताना आपल्याकडे ४ बोट असतात हे लक्षात ठेवावं. पी हळद आणि ही गोरी असे नसते असे बोलून भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
भाजपचे मुरलीधर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, याआधी तुमच्याकडे सत्ता होती आमची जेमतेम ५ वर्ष सत्ता होती, या वर्षी इतर वर्षापेक्षा जास्त पाऊस झाला अशा शब्दात अजित पवार यांना उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशा घटना घडू नये यासाठी पाण्याचे निचरा त्याच प्रमाणे वाहतूक कोंडी या दोन्ही गोष्टींचा उपाय योजना हाती घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. वेळेत न काम झाल्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
मला अभ्यास करायचा आहे की नेमकं काय झालं? याचा अहवाल घेऊन आम्ही पुढे काम करणार आहोत. नाले रुंद करणे आणि इतर कामं देखील करणार असून ट्रॅफिक वर पण ठोस उपाय आम्ही करू असे त्यांनी यावेळी सांगितेल.
पावसाचा दिवशी जिल्हाधिकारी, आयुक्त आम्ही जागे राहून आढावा घेत होतो. लक्ष ठेऊन होतो. २, ३ दिवसात महापालिका, पी एम टी, पोलिस, पी एम आर डी ए या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल. विरोध करणे बरोबर नाही.एकमेकांबरोबर काम करणे महत्त्वाचे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. या सरकारने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की मंत्र्यांची वाट बघू नका कार्यवाही करा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भारतीय जनता पक्षाला पवार कुटुंबीय फोडयचे आहे. पवार कुटुंबीयांमध्ये अंतर्गत भांडण लावायचे आहेत असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केल आहे. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे. तर त्यांच्यामध्ये फूट पडेल असं रोहित पवार यांना का वाटतं असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
