आपल्यातील एक सहकारी त्याच्या कर्तृत्वावर मोठा झाला याचा आनंद चंद्रकांत पाटील यांनी केले मोहोळ यांचे कौतुक
पुणे:भाजप हा मेहनतीने विकसित झालेला, दुसऱ्याला मोठे करण्यात व नव्या पिढीला महत्त्वाची जबाबदारी देणारा हा पक्ष आहे. या पक्षात लोकशाही पद्धतीने काम केले जात असल्याने येथे निवडणूक नाही.खेचाखेची नाही.आपल्यातील एक सहकारी त्याच्या कर्तृत्वावर मोठा झाला याचा आनंद आहे. असे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त करत माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे कौतूक केले.
भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती झाल्याने शहर भाजपतर्फे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, कार्यक्रमांचे निमंत्रक व माजी सभागृह नेते गणेश बीडकर, पुण्याचे प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले,मेहनतीने पक्षाचे संस्कृती विकसित झाले.हिंदू विचारावर पक्ष चालवतो, ज्यात दुसऱ्याला मोठे केले जाते, त्यात आनंद वाटतो.ज्येष्ठ बाजूला राहून नवीन लोकांना संधी
या सर्वाकडे भविष्य म्हणून पाहावे. हे राज्यासाठी गरज आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” गेल्या ३० वर्षांपासून पक्ष हाच परिवार मानून काम करत आहे. वॉर्ड अध्यक्ष पदापासून काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला पक्षाने महापौर होण्याची संधी दिली. आता राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली. गोपीनाथ मुंडे यांनी काम करण्याची प्रेरणा व आधार दिला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांकडून खूप शिकायला मिळाले. माझ्यावर टाकलेला विश्वास मी कधीही ढळू देणार नाही. असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली ३० वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष हाच परिवार मानून काम केले असून वॉर्ड अध्यक्ष ते महापौर आणि आता राज्य सरचिटणीस ही संधी पक्षाने माझ्यावर टाकली आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. चंद्रकांतदादा यांच्या म्हणण्याप्रमाणे बंद पाकिटातून पक्ष देईल, त्या आदेशाप्रमाणे काम करत असून पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काम करण्याची प्रेरणा आणि आधार दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा यांच्यासह सर्वच नेत्यांकडून खूप शिकायला मिळाले आहे. संघटनेने टाकलेला विश्वास मी कधीही ढळू देणार नाही, अशा शब्दात मोहोळांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जगदीश मुळीक म्हणाले,मोहोळ हे कार्यकर्त्यांमध्ये रमणारे नेते असून आम्ही एकत्र काम केले आहे. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने पुणेकरांसाठी खूप काम केले. त्यात स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून मोहोळ यांचा मोलाचा वाटा होता, असे कौतूक मुळीकांनी मुरलीधर मोहोळ यांचे केले.
