Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सेंट मीरा मुलींच्या महाविद्यालयातर्फे तरुणांसाठी ‘हिडन फायर्स’ नाटकाचे आयोजन

पुणे  : सेंट मीरा मुलींच्या शाळेतर्फे शाळेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध नाटककार मंजूला पदमनाभम लिखित ‘हिडन फायर्स’ या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी हे नाटक सादर करणार असून, गुरुवारी, २० ऑक्टोबर रोजी कोरेगाव पार्क येथील शाळेच्या सभागृहात सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित प्रयोगासाठी केवळ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

अतिथी प्राध्यापक, हार्टमन डी सूझा यांच्या नेतृत्वाखाली हे नाटक सादर करण्यात येणार असून, हे नाटक महाविद्यालयाच्या नाट्य अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. या अभ्यासाक्रमांतर्गत दरवर्षी महाविद्यालयाच्या विद्यार्ठीनींकडून नाटक सादर केले जाते. भविष्यात वर्षातून दोन वेळा नाटक सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नाटकाद्वारे समाजातील सर्वसमावेशक वातावरणाच्या गरजेबद्दल जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नाटकाद्वारे महाविद्यालयातील तरुणींना भविष्य घडविण्याबाबत त्यांना वाटणाऱ्या चिंता आणि त्यांच्या मान्यता या तरुण वर्गासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

शाळेतर्फे शुक्रवारी, २१ ऑक्टोबर रोजी सर्वसामान्य नागरीकांसाठी या प्रयोगाचे आयोजन केले जाणार असून, शाळेच्या सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या नाटकासाठी सशुल्क (२५० रुपये /तिकीट) प्रवेश असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading