Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कुत्रिम बुध्दिमत्ता या तंत्रज्ञानाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणे गरजेचे – एम.एम. पंत

पुणे : येणारा काळ हा कुत्रीम बुध्दीमत्ता ( आर्टिफिशल इंटलजन्सी ) च्या तंत्रज्ञानाचा असणार आहे त्यामुळे उद्याचा पिढीला हे फार गरजेचे असणार आहे त्यामुळे काळाची पाऊले ओळखून या तंत्रज्ञानाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात होणे गरजेचे आहे .असे मत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू एम.एम.पंत यांनी पीएमपी प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या पुण्यातील राज्यस्तरीय परिषदेत व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की , प्रत्येक क्षेत्रात कुत्रीम बुध्दिमत्ता हे तंत्र उपयोगी ठरणार आहे . त्यामुळे हे तंत्रज्ञान सर्व क्षेत्राला अवगत झाले पाहिजे .
कुत्रीम तंत्रज्ञान या विषयाचे लेखक दविंदर सिंग मिन्हास म्हणाले की , संगणक आणि डाटा जपून ठेवण्यासाठी व त्याच्या अनेक बाबी मध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे .त्यांनतर त्यांनी परिषदेतील शिक्षक व इतर सहभागी सभासदांच्या शंका व या तंत्रज्ञानाच्या बाबत प्रश्नाची उत्तरं दिली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिएमपी प्रकाशन संस्थेच्या शंग्रिला सिंग यांनी केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading