अंधेरी पोटनिवडणुक : देर आए दुरुस्त आए.. ; सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ऋतुजा लट्टे यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्याची मागणी केली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अंधेरी पोट निवडणुकी बाबत भाजपने योग्य निर्णय घेतला आहे. देर आए दुरुस्त आए.. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रिया सुळे आज पुणे जिल्हा नियोजन समिती तिची बैठक पार पडली तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, गोपीनाथराव मुंडे ,आर आर आबा पाटील ,पतंगराव कदम, यांचे निधन झाल्यानंतर विधानसभा पोटनिवडणूक झाली होती. त्यावेळी अशा घटना घटना घडल्या होत्या. महाराष्ट्राची संस्कृती बदलली आहे. प्रत्येक गोष्टीत राजकरण बघण्याची गरज नाही. असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.
दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाल्यामुळे मध्यवर्ती भागात नद्यांचे स्वरूप आले होते. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले.पुण्यातील पूर परिस्थितीला सत्ताधारी जबाबदार आहेत. स्मार्ट सिटी योजना पूर्णपणे फेल आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
