fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी, उत्कर्ष क्रिडा मंच, गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी 

पुणे  : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात ४ लायन्स् फुटबॉल क्लब अ आणि ब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली. उत्कर्ष क्रिडा मंच आणि गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमी या संघांनी विजयी कामगिरी केली.

हॉटफुट अ‍ॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर झालेल्या सामन्यांमध्ये १४ वर्षाखालील गटांमध्ये इशान हेगडे आणि अर्जुन सिंग याच्या गोलांच्या कामगिरीच्या जोरावर ४ लायन्स् फुटबॉल क्लब अ संघाने स्टेपओव्हर अ‍ॅकॅडमी ३-० असा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी अ संघाने सिटी फुटबॉल क्लबचा १०-० असा धुव्वा उडविला. सामन्यातमध्ये शौनक चोटा याने तीन गोल; अर्णव काटकर आणि अर्जुन सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. सौमिल देशमुख आणि नैतिक एल. यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीने उत्कर्ष क्रिडा मंच ब संघाचा ३-० असा सहज पराभव केला. आदित्य भोरकडे याने केलेल्या गोलांच्या जोरावर उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाने स्टेपओव्हर अ‍ॅकॅडमी संघाचा १-० असा पराभव करून आगेकूच केली. गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघाने बेटा स्पोर्ट्स क्लबचा ४-० असा धुव्वा उडविला. ४ लायन्स् फुटबॉल क्लब ब संघाने जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी संघाचा आणि लौकिक फुटबॉल क्लबचा पराभव करून सलग दोन विजयांची नोंद केली.

स्पर्धेचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः ८ वर्षाखालील गटः
उत्कर्ष क्रिडा मंचः १० (समराज भनवाल ४, रिवान शहा २, केविन भंडारी २, कर्णव गांधी, अव्देत गायकवाड) वि.वि. हॉटफुट अ‍ॅकॅडमीः २ (तेवगिर सिंग, आर्यन सिंग);
४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी अः १० (एकांक्ष ओझा ६, प्रयान पॉल ३, मोक्क्ष एम.) वि.वि. उत्कर्ष क्रिडा मंचः ०;
पुणे फुटबॉल क्लबः ११ (राया भगत ६, नीव झी. ३, कविश एन. २) वि.वि. जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरीः १ (कविश टी.);

१४ वर्षाखालील गटः
४ लायन्स् फुटबॉल क्लब अः ३ (इशान हेगडे २, अर्जुन सिंग) वि.वि. स्टेपओव्हर अ‍ॅकॅडमीः ०;
गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ३ (नीलकांत एम., तेजस डी., अर्णव के.) वि.वि. उत्कर्ष क्रिडा मंच बः ०;
उत्कर्ष क्रिडा मंच अः १ (आदित्य भोरकडे) वि.वि. स्टेपओव्हर अ‍ॅकॅडमीः ०;
४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी अः १० (अर्णव काटकर २, सौमिल देशमुख, नैतिक एल., अर्जुन सिंग २, शौनक चोटा ३) वि.वि. सिटी फुटबॉल क्लबः ०;
गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ४ (नीलकांत जी. २, वैभव एल., अर्णव एम.) वि.वि. बेटा स्पोर्ट्स क्लबः ०;
४ लायन्स् फुटबॉल क्लब बः ७ (मिहीर बक्क्षी, दिव्यान कौशिक २, सचिन सोनिस ३, राजवीर सिंग) वि.वि. जीजी इंटरनॅशनल स्कूल, पिंपरीः ०;
४ लायन्स् फुटबॉल क्लब बः १ (दिव्यांग कौशिक) वि.वि. लौकिक फुटबॉल क्लबः ०;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading