अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य – शरद पवार
मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हटले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचे समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की रमेश लटके यांचा योगदान पाहता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील आणि एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे ते म्हणाले आहेत.
