एमएसएलटीए – फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (16वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत देशभरांतून 120 हून अधिक खेळाडू सहभागी
पुणे : फर्ग्युसन कॉलेज यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए, एमएसएलटीए, पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए – फर्ग्युसन कॉलेज विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(16वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरातून 120हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे दि.15 ते 21 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर यांनी सांगितले की, विजयेंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेश, केरळ, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थान या ठिकाणांहून 120 हून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेला अजित सैल यांच्या कुबेर प्रॉपर्टीज यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये राज्यातील राघव अमीन, ओमकार शिंदे, नील जोगळेकर, स्वराज ढमढेरे, दिव्यांक कवितके, डेनिका फर्नांडो, रिद्धी शिंदे, संचिता नगरकर, क्षिरिन वाकलकर, यांसह कर्नाटकमधून अरिहंत कौल हे मानांकित खेळाडू झुंजनार आहेत.
स्पर्धेतील विजेत्याला 50एआयटीए गुण, उपविजेत्याला 40 गुण मिळणार आहेत. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेचे पात्रता फेरीचे सामने शनिवार व रविवार दि.15 व 16 ऑक्टोबर रोजी होणार असून मुख्य फेरीच्या सामन्यांना दि.17ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.
