भर पावसात शिंदे गटा कडून नव्या चिन्हाच आणि नावाचं जोरदार स्वागत
पुणे : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे गोठावले होते. त्यामुळे परत शिवसेना निवडणूक आयोगाकडे आपल्याला चिन्ह मिळण्यासाठी अर्ज केला होता.भारतीय निवडणुक आयोगाकडून शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशाल चिन्ह देण्यात आले व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व असे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव देऊन त्यांना ढाल आणि तलवारींचं चिन्ह देण्यात आलं. त्याचा आनंद उत्सव साजरा आज पुण्यात शिंदे गटाने केला.हा आनंदोत्सव सारसबाग चौक येथे करण्यात आला.
आनंद उत्सव पावसात साजरा केला गेला. या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे,अजयभोसले, सहसंपर्कप्रमुख,उल्हास तुपे, जिल्हाप्रमुख,पूजा रावेतकर, महिला आघाडी,लीनाताई पानसरे,महिला आघाडी व शिंदे गटातील पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाना भानगिरे म्हणाले, खरी शिवसेना ही आमची व बाळासाहेब यांची आहे. खरा विजय हा आमचा झाला असून. येणाऱ्या पुढील काळात खरी शिवसेना ही आमची राहणार आहे. अंधेरी पोट सभा निवडणुकीमध्ये आमचा विजय होणार. असे नाना भानगिरे म्हणाले.
