Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थी आंदोलनाचा निर्णायक विजय

पुणे : शुल्क वाढ रद्द करण्यासह अन्य तीन मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलन अखेर चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करत आल्याचे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार , बाबा आढाव यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
कुलगुरु, कुलसचिव, अधिष्ठाता, उपकुलसचिव यांची कृती समिती व शिष्टमंडळासोबत वाजता झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे अशी माहिती विद्यापीठ कृती समितीच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे.

झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले-
१) शुल्क वाढ रद्द करण्याबाबत तातडीने विशेष उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. सदर समिती पुढील तीन आठवड्यापूर्वी शुल्क निर्धारण समिती कडे प्रस्ताव सादर करणार.
२) सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू, तसेच गेस्ट पध्दती सुरू करण्यात येणार
३) विद्यार्थ्यांच्या तक्रारी नुसार परिक्षा संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार
४) शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यापीठ व महाविद्यालये यांना थेट मिळते, मात्र संबंधित संस्थेकडून पुन्हा शुल्क आकारले जात असल्यास कार्यवाही होणार
५) कोरोनाच्या काळात शुल्क सवलत देण्याचे आदेश असताना शुल्कवाढ लागू केली आहे, त्याबाबत तात्काळ कार्यवाही होणार.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading