Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

एमक्युअर तर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ

५७ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण


वंचित विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी एमक्युअर फार्मास्युटिकल्स पुण्यातील ५७ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एमक्युअर फार्मास्युटिकल्स या शैक्षणिकदृष्ट्या हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शुल्का पैकी ८०% चा भार उचलेल.

निवडलेले विद्यार्थी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे विविध अभ्यासक्रम शिकत आहेत. या संस्थेबरोबर एमक्युअरचा सहयोग सात वर्षांपूर्वी पासून सुरू झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे  आवश्यक शुल्काची पूर्तता करता येत नाही त्यांना गरजेनुसार आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. हा उपक्रम म्हणजे उद्याच्या तेजस्वी मनांना त्यांच्या शिक्षणाच्या अत्यंत नाजूक टप्प्यात पाठिंबा देण्यासाठी एमक्युअरचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.

एक समग्र वार्षिक पडताळणी प्क्रि या सर्वात योग्य उमेदवार निवडण्याचा आधार बनवते. गेल्या सात वर्षांत सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading