Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

ज्या नेत्यांना खुश करायचे ते बंद खोलीत करा; रोहित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे : भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका भाषणात एक वेळ आई-वडिलांना शिव्या घातल्या तर चालतील मात्र मोदी शहाणा शिव्या घातलेल्या सहन करणार नाही, असं वक्तव्य केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी खास पवार शैलीत चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. जे काही नेत्यांना खुश करायचे आहे; ते बंद खोलीत करा. आई-वडिलांचा अपमान करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही; असं रोहित पवार पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांनी पालिकेचा राजीनामा दिला. परंतु पालिका राजीनामा घेत नाही. त्यावर, यात वेगळं राजकारण असावं. कारण लोकांनी अनेक गोष्टी मागील काही दिवसांपासून बघितलेल्या आहेत. सध्या नेत्यांचाही आवाज दाबला जातोय, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.

रोहित पवार पुणे विद्यापीठात भरमसाठ शुल्क वाढी विरोधात विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. त्यात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा विषय अजित पवार यांना सांगितला आहे. अशा पद्धतीने फी वाढ करणे चुकीचे आहे.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय आम्ही नेणार आहोत. तीन हजार असणारी फी आठ हजार झाली आहे. मुळात भाजपची काम करण्याची पद्धत म्हणजे ते यादी बघून काम करतात, विद्यार्थ्यांच्या परिस्थितीशी त्यांना देणंघेणं नसतं. पूर्वी हे विद्यापीठ कितव्या क्रमांकावर होतं आणि आज कितव्या क्रमांकावर आहे? ही गंभीर बाब आहे.’ असं सांगून रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकारदरबारी मांडणार असल्याचं सांगितलं.

भाजपचे नेते राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या ताब्यात असलेल्या बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा गळती हंगाम सुरु झाला नसल्याचं निदर्शनास आणल होतं. त्यामुळे रोहित पवार यांची चौकशी सुरू होती. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्याला क्लिन चीट दिली. त्यामुळे रोहित पवार यांना दिलासा मिळाला. त्यावर मी राम शिंदे यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा कारखाना सुरू केला होता, असे रोहित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading