Viral naked video : दत्तवाडी परिसरात 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या
पुणे : पुणे शहरात व परिसरात तरुण व तरुणींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. दत्तवाडी परिसरातील एका 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शंतनु वाडकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनु यांची इंस्टाग्राम वरुन प्रीत यादव नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. दोघेही एकमेकांसोबत चॅटिंग करायचे. दरम्यान प्रीत यादव नामक व्यक्तीने शंतानुला अर्धनग्न फोटो पाठवण्यास सांगितले होते. मागणीला बळी पडून त्याने हे फोटो पाठवले. त्यानंतर मात्र हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात झाली. शंतनूने 4500 हजार रुपये त्या व्यक्तीला दिले. मात्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा पुन्हा पैसे मागितले जात होते. या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यालाही एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले होते.
