fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

पुणे विद्यापीठाने यंदा टाइम्समधील ६०१-८०० या क्रमवारीच्या गटात स्थान मिळविले

पुणे : द टाइम्स हायर एज्युकेशन क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा सुधारणा केली आहे. गेल्या वर्षी ८०१ ते १००० व्या क्रमवारीत असलेल्या विद्यापीठाने यंदा ६०१-८०० या क्रमवारीच्या गटात स्थान मिळविले आहे.


भारतीय तंत्रज्ञान संस्था आर्थात आयआयटींपैकी काही नामांकीत संस्थांनी सहभागी होण्यास नकार दिल्याने, आयआयटी रोपरला ५०१-६०० या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग जाहीर झाली असून, त्यात पुणे विद्यापीठाच्या गुणांकनामध्ये वाढ झाली आहे. या पूर्वी, २०१९ सालामध्ये विद्यापीठाला ५०१-६०० या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणेचे (आयसर) चे गुणांकन घसरले असून, यंदा आयसर पुणेला १००१-१२०० या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी आयसरला ८०१-१००० या क्रमवारीत स्थान मिळाले होते.
पुणे विद्यापीठाने बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, ग्राफिक एरा युनिव्हर्सिटी, आयआयटी इंदूर, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा विद्यापीठांच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठानंतर अण्णा युनिव्हर्सिटी आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा क्रमांक आहे.
स्थान पटकाविणाऱ्या देशातील शिक्षणसंस्था – ७५

  • जगातिल पहिल्या पाच शैक्षणिक संस्था – युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, हॉवर्ड य़ुनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, एमआयटी (अमेरिका)
  • भारतीय विज्ञान संस्था बंगळुरूची क्रमवारी – २५१-३००

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading