महापालिकेने पीएमआरडीएकडे ३३ लाख २२ हजार रुपयांची मागणी केली
पुणे : शहरात व मेट्रो मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडल्याने येथे महापालिकेने खड्डे बुजविले आहेत. पण ही जबाबदारी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची असताना महापालिकेने खड्डे बुजविले. त्यामुळे महापालिकेने पीएमआरडीएकडे ३३ लाख २२ हजार रुपयांची मागणी केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावर गणेशखिंड रस्ता, बाणेर रस्ता येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांनी पुणे महापालिकेवर टीकेची झोड उठवली. या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पीएमआरडीएने खड्डे बुजविणे आवश्यक होते.

नागरिकांना त्रास होत असल्याने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पथ विभागाला खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानुसार विविध ठिकाणी खड्डे बुजविले. पण या कामासाठी ३३ लाख २२ हजार रुपयांचा खर्च झाला होता. हे पैसे पीएमआरडीने महापालिकेला द्यावेत, असे पत्र पथ विभागाने पीएमआरडीएला पाठवले आहे.