Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळाले ‘मशाल’ चिन्ह

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाव असणार आहे. तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह हे मशाल असणार आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना असे नाव असणार आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने हा निर्णय जाहीर केला आहे.

मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते. त्यानंतर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्या गटांना तीन चिन्हांचे पर्याय देण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार शिवसेनेने तीन चिन्ह सुचवले होते. त्यातील मशाल हे चिन्ह त्यांना मिळाले आहे. तर शिंदे गटाने सुचवलेल्या चिन्हामधील गदा हे चिन्ह रद्द करण्यात आले तर दुसरी दोन चिन्ह ही ठाकरे गट व शिंदे गट यांची एकच होती. त्यामुळे त्यांना पुन्हा चिन्ह पर्याय देण्यास सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading