fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘ती माझी प्रेमकथा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

आयुष्यात प्रत्येकजन एकदा का होईना प्रेमात पडतोच. मात्र हेच प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मात्र सर्वांची निराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते तर काहींना प्रेमात असफलता मिळते. प्रेम टिकणार की नाही हे ज्यावर अवलंबून असते तो म्हणजे विश्वास, अशाच प्रेमाच्या विश्वासाची प्रेमकथा घेऊन, अतिविश्वासमुळे झालेला प्रेमाचा घात घेऊन ‘फिल्मी टाईम प्रोडक्शन’ सह आणि ‘कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट’ सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कावार निर्मित ‘ती माझी प्रेमकथा’ या प्रेममय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. येत्या 14 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे.
अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धकिते या नव्या कोऱ्या जोडीने तर चित्रपटाच्या ट्रेलर मध्येच शाबासकी मिळवली आहे. तर ट्रेलरची सुरुवातच सर्वांच्या लाडक्या आवाजाने म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या आवाजात सुरू झाल्याने त्यांच्या तोंडून ही प्रेमकथा ऐकणं नक्कीच रंजक ठरतंय. अभिनेता कपिल कांबळेच्या अभिनयाची जादूही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या सांभाळत चित्रपट बनविला आहे. या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार राजवीर गांगजी यांनी सांभाळी आहे.
 ट्रेलर पाहून आता 14 ऑक्टोबरची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. हा सिनेमा येत्या 14 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading