fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsSports

पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022 स्पर्धेत समायरा ठाकूर, ईथन लाहोटी, ओवी मारणे, ऋषभ ए यांना विजेतेपद   

पुणे : रोहिल शिंदे टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-आयकॉन रोहित शिंदे टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2022  स्पर्धेत 8 वर्षाखालील गटात समायरा ठाकूर व ईथन लाहोटी यांनी, तर 10 वर्षाखालील गटात ओवी मारणे व ऋषभ ए यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले. 
 
रोहित शिंदे टेनिस अकादमी, कर्वेनगर येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत मुलींच्या गटात दुस-या मानांकित समायरा ठाकूरने अव्वल मानांकित झिया सैफी हिचा 7-2 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. समायरा ही व्हिबग्योर शाळेत शिकत असून निर्भया टेनिस अकादमीत प्रशिक्षक सुरज रॉय व मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे हे या गटातील दुसरे विजेतेपद आहे. तर मुलांच्या गटात बिगर मानांकित ईथन लाहोटीने अव्वल मानांकित रेयांश गुंडला 7-3 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. 
 
10 वर्षाखालील मुलींच्या गटात ओवी मारणे हिने देवेशी पांडियाचा 7-1 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. ओवी ही मुक्तांगण इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून अक्षय शहाणे टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक मिलिंद मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तर मुलांच्या गटात बिगर मानांकित ऋषभ ए  याने अव्वल मानांकित इथन लाहोटी याला 7-2 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. 
 
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण रोहित शिंदे व स्पर्धा संचालक रोशन गर्दे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे उपस्थित होत्या. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 8 वर्षाखालील मुली
झिया सैफी(1) वि.वि वाणी चतूर 6-0
समायरा ठाकूर(2) वि.वि भाव्या सोनकर 6-0
अंतिम फेरी: समायरा ठाकूर(2) वि.वि  झिया सैफी(1) 7-2
 
8 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
रेयांश गुंड(1) वि.वि.ओजस पवार(6) 6-1
इथन लाहोटी वि.वि. श्रिराज देवरे 6-1 
अंतिम फेरी : ईथन लाहोटी वि.वि रेयांश गुंड(1)  7-3
 
10 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
देवेशी पांडिया वि.वि झिया सैफी(1)  6-5(1)
ओवी मारणे  पुढेचाल.वि  इशना नायडू
अंतिम फेरी: ओवी मारणे वि.वि देवेशी पांडिया 7-1
 
10 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
इथन लाहोटी (1) पुढे चाल वि आयुष मिश्रा
ऋषभ ए  वि.वि अर्जून पाटोळे 6-3
अंतिम फेरी: ऋषभ ए  वि.वि इथन लाहोटी (1) 7-2

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading