fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात का ओढतात? चित्रा वाघ यांचा सवाल

पुणे:उद्धवठाकरे यांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात उत्तर दिलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही ठाकरे यांना याबाबत एक भावनिक पत्र फेसबुकवर लिहिलं. एका दुखावलेल्या बापानं माजी मुख्यमंत्र्याला विनंती केली की राजकारण होतच राहील हो…टीका टिप्पणी होतच राहील. पण त्यात निरागसतेला ओढू नका हो. पाप आहे हे. आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं. त्या पापाचे धनी होऊ नका. कृपा करा.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या नातवावर टीका केली. यावरुन ठाकरेंचा अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.
भाजपने उद्धव ठाकरेंच्या विरोधार जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला. तेव्हा एखाद्या शिवसैनिकाला हे पद न देता उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेतले. यावरुन चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद, मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद, शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद, एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद, पदे वाटताना’माझे कुटुंब-माझी जबाबदारी’पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात,
त्या दीड वर्षांच्या बाळावर टीका करताना त्याचा आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही, की तिला काय वाटेल.शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं. तुम्ही तर तेही विसरलात. महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीचं गेले नव्हते. ज्यांनी नेले त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्यांना फटकारले आहे.

Leave a Reply

%d