fbpx

पद्मश्री लिला पुनावाला यांना जगातील सर्वोच्च  ‘महात्मा पुरस्कार’ प्रदान.

पुणे : लिला पुनावाला (पद्मश्री पुरस्कार प्राप्त) यांना नुकताच नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘महात्मा जीवनगौरव पुरस्कार’प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. महात्मा पुरस्कार जगभरातील प्रभावशाली व्यक्तित्व आणि बदल घडवणाऱ्यांना देण्यात येतो. जे विशेष सामाजिक योगदान देतात आणि भविष्याचा मार्ग दाखवतात. सुरूवाती पासूनच हा पुरस्कार खाजगी, सार्वजनिक आणि विकास क्षेत्रातील सामाजिक जबाबदारी निभावणारे, यशस्वी , मानवतावादी, परोपकारी, जबाबदार, सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेणार्यांना देण्यात येतो.
महात्मा पुरस्काराची सुरूवात अमित सचदेवा यांनी केली होती, ज्यांना ‘भारताचा सीएसआर मॅन’ म्हणून ओळखले जाते. लीला पुनावाला फाउंडेशनच्या (एलपीएफ) अध्यक्षा लिला पुनावाला यांनी वंचित मुलींच्या व्यावसायिक शिक्षणासाठी एलपीएफच्या शिष्यवृत्तीद्वारे मोठे योगदान दिले आहे. एलपीएफ हे भारतातील ना-नफा ना तोटा तत्वावर कार्यरत पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ज्याची स्थापना १९९५ मध्ये लिला पुनावाला आणि फिरोज पूनावाला (संस्थापक विश्वस्त, एलपीएफ) यांनी केली. एलपीएफ ही एफसीआरए या विश्वासार्ह आघाडीद्वारे मान्यताप्राप्त व नोंदणीकृत संस्था आहे. एलपीएफ ने शैक्षणिकदृष्ट्या गुणवंत परंतु आर्थीकदृष्या दृर्बल व आवश्यक शैक्षणिक सुविधांचा आभाव असलेल्या मुलींना मेरिट-कम-नीड आधारित शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुदान शिष्यवृत्ती देऊन आजतगायत त्यांनी हजारो मुलींची मदत केली आहे. शिष्यवृत्ती सोबत वैयक्तिक आणि व्यावसायिक कौशल्य निर्माण कार्यक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणासाठी पायाभूत योगदान दिले आहे. जेणेकरूण या मुलींना फंक्शनल, टेक्निकल, प्रोफेशनल आणि एम्पॉयबिटी स्किल्स शिकण्याची संधी मिळेल. एलपीएफने १२,००० हून अधिक मुलींना पाठिंबा दिला आहे. येथे दर वर्षी १००० हून अधिक मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. फाउंडेशन शालेय मुलींना त्यांच्या पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देते.

Leave a Reply

%d bloggers like this: