अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत विजयादशमीनिमित्त पाटीपूजन व सरस्वतीपूजन
पिंपरी :जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मिडीयम स्कुल, लिटल फ्लॉवर विद्यालय व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात विजयादशमीनिमित्त पाटी पूजन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पिंकी मणिकम, शिक्षिका वसुधा म्हेत्रे, तृप्ती जगताप, अश्विनी वाघमारे, शारदा पोफळे, दीपा गायकवाड, मोनिका रामस्वामी, ज्योती फर्तीयाल, अमृता अमोलिक, तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी पाटीवर रेखाटलेल्या सरस्वतीचे मंत्र उच्चारण करून पूजन केले. तसेच उत्तम विद्या प्राप्त होवो, अशी सरस्वतीची प्रार्थना केली.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून का देतात ? तसेच आपट्याच्या पानांचे आरोग्यदायी आहे. प्रत्येक कन्या ही देवीचे रूप असते, तिचा आदर केलाच पाहिजे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. संस्थेचे सचिव प्रणव सर यांनी विद्यार्थ्यांचे शस्त्र म्हणजे लेखणीद्वारे अज्ञानाचा पराजय करून ज्ञानाचा विजय प्राप्त होऊ शकतो, त्या लेखणीचे, वहीचे, पुस्तकांचे व दप्तराचे पूजन करतात या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना दसऱ्याचे महत्त्व व पाटी पूजन का केले जाते ? नवरात्रीच्या नऊ दिवसांची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. दरम्यान, लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. मुलींनी देवीची वेशभूषा केली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तृप्ती जगताप, दीपा गायकवाड, अमृता अमोलिक यांनी केले.
