fbpx

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हे राष्ट्रनिर्मितीचे कार्य – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत

पुणेः कुटुंब सांभाळून काम करताना महिलांची तारेवरची कसरत होते. अशा महिला समाजात कर्तृत्व गाजवतात तेव्हा त्या इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्श असतात. अश्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे एकप्रकारे राष्ट्रनिर्मितीचे कार्यच आहे. महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करणारे कार्यक्रम नेहमीच व्हायला हवेत, असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व आर्थिक दृष्ट्या कुटुंबासाठी हातभार लावणाऱ्या ५० महिलांचा सन्मान भाजपा एनजीओ आघाडीच्या वतीने करण्यात आला. शिरोळे रस्त्यावरील सुदर्शन हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास लेखिका डॉ. सुवर्णा निंबाळकर, एनजीओ आघाडी पुणे शहरचे अध्यक्ष व आयोजक डॉ. अजय दुधाणे, उपाध्यक्षा सविता गायकवाड, सरचिटणीस संजय हिरवे, समन्वयक दत्तात्रय सोनार, प्रमोद शेळके, अमित शिंदे, केतन जैन, निखिल कदम, विनोद चव्हाण उपस्थित होते.

सुवर्णा निंबाळकर म्हणाल्या, आपल्या इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की अनेक कर्तृत्ववान महिलांचा इतिहास आपल्याला माहिती नाही. असा प्रेरणादायी इतिहास पुढे आला पाहिजे. बाहेर जाऊन बघण्यापेक्षा महाराष्ट्रात लढलेल्या आपल्या थोर स्रियांचा इतिहास वाचा. ज्यामुळे महिलांना त्यांच्या कार्यातून आणखी ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रूपात आपल्यावर संस्कार करत असते. ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो. कुटुंब सांभाळून आर्थिक दृष्ट्या हातभार लावणाऱ्या महिलांचा सन्मान होणे देखील गरजेचे आहे. सूत्रसंचालन संजय हिरवे यांनी केले. दत्तात्रय सोनार यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: