fbpx

खरंच, दोन वर्ष आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो -चंद्रकांत पाटील

पुणे: भाजपचे नेते   चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीचे सरकार असताना सारखे म्हणायचे की दोन अडीच वर्षात आघाडीचे सरकार कोसळेल.दोन अडीच वर्ष मी म्हणत होतो की, आपलं सरकार येणार, मी वेडा नव्हतो, मला माहिती होतं की आपलं सरकार येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होतो.अडीच वर्ष खरंच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात पत्रकाराची बोलताना म्हणाले.

आज पुणे भाजप शहर तर्फे चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्री म्हणून निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला.
काल मुंबई त दसरा मेळावा शिवसेनेचा व शिंदे गटाचा पार पडला. त्यात विविध पक्षांचे नेत्यांनी कोणाचे भाषण ऐकले. याची चर्चा सुरू आहे. त्यावर उध्दव ठाकरे यांचं भाषण ऐकल नाही मात्र वेळ काढून रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकल. तसेच बारामती हा जिल्यातील राजकारणाचा एक कण आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महापालिका जिल्हा परिषद निवडणुका मध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे. त्यावरबाकी जिल्ह्यातील सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार.पुणे महापालिका जिल्हा परिषद पिंपरी चिंचवड महापालिका सगळं जिंकणार.सगळ्या मतदारसंघ रिबाँड करणार.जिजा का शिवसेनेच्या वाटेला जाईल ती जागा देखील आपण निवडून आणली पाहिजे. युतीत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्था अनेक ठिकाणी आम्ही वेगळ्या लढलो.विधानसभेत आम्ही १६० जागा निवडून आणू. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 पत्रकारांनी विचारले की तुम्ही दादाचा पुण्याची पालकमंत्री झाले आहात. तुम्ही आता पुण्याचा विकास कसा राबवणार आहात. त्यावरआम्हाला स्वच्छ पुणे सुंदर पुणे कऱ्याच आहे. शहरातील सगळ्या गोष्टींचा मी आढावा घेणार. लोकांचे प्रश्न सोडवणे आणि संघटना मजबूत करणे. सुरक्षित पुणे करणार .जशा जशा निवडणुका येतील तसा तसा विचार करून कार्यकर्त्याच्या भावणाचा आदर करू आणि निर्णय करू. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: