fbpx

ग्लेनमार्क प्रौढांमधील टाईप २ मधुमेहासाठी भारतात लोबेग्लिटाझोन सादर करणारी पहिली कंपनी ठरली

पुणे :  नवीन प्रयोगांवर भर देणारी जागतिक औषधी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) भारतातील प्रौढांमधील अनियंत्रित टाईप २ मधुमेहाच्या उपचारासाठी थायाझोलईडीनडायोन लोबेग्लिटाझोन

(लोबेग्लिटाझोन) सादर करणारी पहिली कंपनी ठरली आहे. एलओबीजी या ब्रँड नावाने मार्केटिंग करण्यात येणाऱ्या या औषधात लोबेग्लिटाझोन (०.५ मिग्रॅ) आहे आणि ते प्रौढ मधुमेही रुग्णांमधील ग्लायसेमिक नियंत्रण सुधारण्यासाठी प्रिस्क्रिप्शन नुसार दररोज घ्यायचे आहे. भारतीय लोकांमध्ये इन्शुलिनविरोध मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इन्शुलिनविरोधी मधुमेही रुग्णांमध्ये अनियंत्रित टाईप २ मधुमेह हाताळण्यासाठी एलओबीजी हा उपचाराचा आकर्षक पर्याय ठरतो.

ग्लेनमार्कला भारतातील औषधी नियंत्रक संस्था ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून लोबेग्लिटाझोनचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. वय वर्षे १८ किंवा त्याहून अधिक अशा प्रौढ टाईप २ मधुमेही रुग्णांवर विनाक्रम आणि डबल-ब्लाईंट फेज ३ क्लिनिकल चाचण्या घेतल्यानंतर ही परवानगी देण्यात आली होती. या चाचण्यांमध्ये लोबेग्लिटाझोनमुळे जलद आणि सुधारित ग्लायसेमिक नियंत्रण दिसून आले होते.

या प्रसंगी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचे इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझिनेस हेड आलोक मलिक म्हणाले,“ आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या म्हणण्यानुसार, भारतातील ७ कोटी ४० लाख लोकं मधुमेहाने ग्रस्त असून त्यांपैकी सुमारे ४० टक्के इन्शुलिनविरोधी दिसून येतात. मधुमेहाच्या उपचारासाठी अग्रगण्य उपचार पुरवणारे या नात्याने एलओबीजी सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. हे एक नवीन आणि परवडणारे औषध असून ते देशातील अनियंत्रित टाईप २ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या प्रौढ रुग्णांमधील इन्शुलिनविरोधाचा सामना करण्यात मदत करेल.”

ग्लेनमार्क आणि भारतातील मधुमेह

मधुमेही रुग्णांसाठी नवीन आणि परिणामकारक पर्याय उपलब्ध करून देण्याची ग्लेनमार्कची मोठी परंपरा आहे. भारतात ग्लेनमार्कने पहिल्यांदा टेनेलिग्लिप्टिन हे डीपीपीपी ४ इनहिबिटर सादर करून २०१५ साली आणि त्यानंतर टेनेलिग्लिप्टिन + मेटफॉर्मिन हे निश्चित मात्रेतील मिश्रण सादर करून मधुमेह उपचारांमध्ये क्रांती केली होती.

आपली ही परंपरा कायम राखत ग्लेनमार्कने जागतिक पातळीवर मंजूरी मिळाल्यानंतर रेमोग्लिफ्लोझिन हे अनोखे एसजीएलटी -२ इनहिबिटर २०१९ मध्ये सादर केले होते. त्यानंतर मेटफॉर्मिन आणि विल्डाग्लिप्टिन यांच्यासोबतची मिश्रणे सादर केली होती.

आयक्यूव्हीआयए यांच्या ऑगस्ट २०२२ मध्ये संपलेल्या १२ महिन्यांच्या विक्रीच्या माहितीनुसार, भारतातील तोंडाने घ्यायच्या

मधुमेहविरोधी औषधाची बाजारपेठ अंदाजे ११,७२५ कोटी रुपयांची असून त्यात मागील वर्षीच्या (ऑगस्ट २०२१) त्याच अवधीच्या तुलनेत वार्षिक ७ टक्के वाढ झाली. आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) माहितीनुसार, भारतात २०४५ पर्यंत १२ कोटी ५० लाख लोकांना मधुमेह होऊ शकतो. त्यांपैकी ७७ टक्के रुग्णांमध्ये अनियंत्रित मधुमेह असेल. याशिवाय भारतातील प्रत्येक १० मधुमेह रुग्णांपैकी चार जणांमध्ये इन्सुलिन विरोध दिसून येतो.

Leave a Reply

%d bloggers like this: