fbpx
Monday, September 25, 2023
Latest NewsLIFESTYLE

आर्टिस्ट सुजाता धारप यांचे साद-प्रतिसाद चित्र प्रदर्शन

पुणे : कलाकार सुजाता धारप साद-प्रतिसाद नावाची नवीन पेंटिग सिरीज प्रदर्शित करणार असुन मिनिमल स्ट्रोक आर्ट गॅलरी, सह्याद्री फार्म्स, बाणेर रोड – पुणे येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० या वेळेत आयोजित केले जाईल. ७ ऑक्टोबर रोजी त्यांचे गुरू आणि प्रख्यात कलाकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते सायंकाळी याचे उद्घाटन होईल. सुजाता धारप लहानपणापासून त्यांचे वडील दिवंगत कलाकार बाळ वाड यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकारी करतात होत्या. त्यांनी १९८५ मध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून पदवी प्राप्त केली आणि तेथुनच म्युरल्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यांनी आपल्या कार्याचे २७ सोलो शो केले असुन भारत आणि विदेशातील ग्रुप शोमध्येही सहभाग घेतला आहे.
सुजाता भिंती, छप्पर आणि जमीनीवर अश्या अनेक माध्यमांमध्ये काम करतात. १९८१ मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या क्रिएटिव्ह क्लब पुणे येथे त्या कलेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.   साद प्रतिसाद बद्दल: त्या गेल्या वर्षभरापासून प्लायवूडवर काम करत आहेत, एकदा त्यांना त्यांच्या छातावरील काही लाकडी फळ्या जुन्या काळातील अवशेषांसारख्या भासल्या जणू काही त्या त्यांची कहाणी सांगत होत्या. यातुनच प्रेरित होऊन त्यांनी ही प्लायवूड वरील कलाकारी सूरू केली. प्रदर्शन – ८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२२ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत स्थळ – मिनिमल स्ट्रोक आर्ट गॅलरी, सह्याद्री फार्म, बाणेर रोड – पुणे.

Leave a Reply

%d bloggers like this: