वॉर्डविझार्डतर्फे इलेक्ट्रिक दुचाकीच्या ४२६१ युनिट्सची विक्री, सप्टेंबर २०२२ मध्ये ७० टक्के वाढीची नोंद
वडोदरा : वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि – या भारताताली आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड ‘जॉय ई बाइक’च्या उत्पादक कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकीच्या ४२६१ युनिट्सची विक्री केली असून ७० टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने २५०० युनिट्सची विक्री केली होती.
इलेक्ट्रिक वाहनांना असलेल्या वाढत्या मागणीसह कंपनी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत आहे. ऑगस्ट २२ मध्ये कंपनीने १७२९ युनिट्सची विक्री केली होती आणि त्याच्याशी तुलना करता कंपनीने मासिक पातळीवर १४६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
सप्टेंबर महिन्यातील विक्री आकडेवारीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यतिन गुप्ते म्हणाले, सणासुदीचे दिवस आणि ग्राहकांमधील सकारात्मक वातावरण यामुळे बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वाढत असताना दुसरीकडे पुरवठा साखळीमध्येही सुधारणा होत असल्यामुळे आमच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळत आहे. सणासुदीचे दिवस आणि वैयक्तिक वाहनाची वाढती गरज यांच्या जोरावर दमदार रिटेलची आमची अपेक्षा आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातील बाजारपेठेत अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून नेपाळमध्ये विक्री सुरू केली असून इतर जागतिक बाजारपेठांमध्येही नव्या संधींचा शोध आम्ही घेत आहोत. बाजारपेठेची सध्याची क्षमता लक्षात घेता बाजारपेठेतील तेजीचे वातावरण टिकून राहील याबाबत आम्ही आशावादी आहोत.’
ग्राहकांमधील सकारात्मक वातावरण आणि पुरवठा साखळीतील समस्यांचे निराकरण केल्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत ८४४८ युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष २२ मधील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा ५५ टक्क्यांची वाढ झाली असून तेव्हा कंपनीने ५४४६ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती.