Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढच्या वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा – डॉ. नीलम गोऱ्हे

कार्ला, : शिवसेना परिवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व कुटुंबियांच्या श्रध्दास्थानी असलेल्या श्री. एकविरा देवीच्या दर्शनाने आज मनाला वेगळेच समाधान लाभले. एकविरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात लवकरच एक बैठक घेऊ. या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड मोहीम ‘ आज पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनाने समाप्त झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, एकविरा देवीच्या मंदिरातील मुकुट चोरी झाल्याच्या प्रश्नांवर मी पाठपुरावा केला होता. त्याच बरोबर देवीचे दागिने कुठे आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या दागिन्यांना परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्तरावर या परिसरातील जमिनींचा ताबा घेतल्याचे प्रश्न प्रलंबित आहे. यावर लवकरच बैठक घेणार आहे.

चौकट : मावळ तालुक्यात अनेकांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाटक केले. आज मात्र त्यांची अवस्था ‘खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले …’ अशी झाली आहे. मावळ वासियांच्या भावनांचा विचार न करता ते आज शिवसेना पक्षची मूळ विचारधारा सोडून गेले आहेत. मात्र आपण सर्व शिवसैनिक भक्कम असून यामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही असे यावेळी त्यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, स्थानिक शिवसेना पदाधिकारी मच्छिंद्र खराडे, सुरेश गायकवाड, अनिता गोणते, शैला खंडागळे, वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर, पुणे महिला आघाडीच्या अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, स्वाती रणपिसे, सुनीता रानवडे, रुपाली सुतार, पिंपरी चिंचवड येथील वैशाली मराठे, अनिता तुतारे, रोशनी जगताप, ज्योती भालके, वंदना वाल्हेकर, कामिनी मिश्रा, सुवर्णा मगर, प्रतीक्षा घुले, डॉ. वैशाली कुलथे, मुळशी तालुक्यातील सुरेखा तोंडे.सुनिता तोंडे अपेक्षा तोंडे, सविता तोंडे, बेबी तोंडे, मिनाक्षी तोंडे जिल्हा संघटीका शैला ताई खंडागळे. तालुका संघटीका अनिता गोणते. कुसगाव संघटीका रोशनी जगताप. वरसोली संघटीका ज्योती चव्हाण. कामशेत शहर संघटीका उषा इंगवले. कामशेत उपसरपंच इंगवले, देहू शहर संघटिका सुनंदा ढमाले. केवरे शाखा संघटीका शोभा दळवी. उप संघटीका निर्मला ढाकोळ विमल जगताप. आदी महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading