fbpx

विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणार पुण्यातील शिवसैनिकांचा विश्वास

पुणे : यावर्षीचा दसरा मेळावा विविध कारणांनी चर्चेत असून शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये घमासान युद्ध पाहायला मिळालं होतं याच पार्श्वभूमीवर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली असताना आता पुण्यातील शिवसैनिक देखील उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी सज्ज झाले असून लाखोंच्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर येतील आणि स्वयंस्फूर्तीने उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकतील असा विश्वास शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मिंधे गटाकडून आमच्या रस्त्यात अडचण निर्माण करण्याचे कितीही प्रयत्न करण्यात आले तरी हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील असे देखील थरकुडे यावेळी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: