fbpx

राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने केला महागाईचा रावण दहन

 

पुणे: केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सर्व सामान्य जनतेला महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांचा रोजच नाईलाजाने सामना करावा लागत आहे. सर्व सामान्य जनतेचा महागाई, बेरोजगारी विरोधी आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराच्या वतीने सर्वसामान्य जनतेला सतावणाऱ्या प्रश्नांचा रावण दहन करण्यात आला. हे दहन राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन येथे करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप,राष्ट्रवादी यूवक कॉंग्रेस चेअध्यक्ष किशोर कांबळे, प्रवक्ते प्रदीप देशमुख, रोहन पायगुडे, व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने या वेळी बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजेधार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे..या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
प्रशांत जगताप म्हणाले,”देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.असे मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

%d bloggers like this: