fbpx

नृत्य आणि संगीताच्या विशेष मैफिलीतून कोजागिरीच्या चंद्राला अभिवादन

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विलास जावडेकर डेव्हलपर्स’तर्फे ‘यूं सजा चांद’ कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लख्खपणे उजळणाऱ्या पूर्णाकृती चंद्राच्या सौंदर्याचे कौतुक करत, हा सुंदर क्षण साजरा करण्याच्या उद्देशाने विलास जावडेकर डेव्हलपर्स’तर्फे ‘यूं सजा चांद’ या विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना मधुरित सारंग आणि पं. राजेंद्र गंगानी यांच्या शिष्या आणि नृत्यांगना श्रद्धा हर्डीकर-शिंदे आणि अर्चना अनुराधा या आपल्या ३० सहकाऱ्यांसोबत नृत्य प्रस्तुती करतील.

हा कार्यक्रम रविवारी, ९ ऑक्टोबर रोजी, सायंकाळी ७ वाजता, विधी महाविद्यालय रस्ता येथील भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्सटीट्युट’च्या एम्पीथिएटर येथे होईल. कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असणार आहे. नागरिकांसाठी मोफत प्रवेशपत्रिका ३ ऑक्टोबरपासून विलास जावडेकर डेव्हलपर्स’च्या कोथरूड आणि सूस येथील कार्यालयात सकाळी १०  ते सायंकाळी ७  यावेळेत उपलब्ध असतील.

Leave a Reply

%d bloggers like this: