fbpx

फेडरेशन चषक रोलबॉल शुक्रवारपासून रंगणार

पुणे  : भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धेचे आयोजन जिल्हा रोलबॉल मैदान, बाणेर येथे ७ ते ९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिली.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मुली व मुले अशा दोन्ही विभागात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मुलांच्या गटातून राजस्थान, महाराष्ट्र, आरएसएसए, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, गोवा तर मुलींच्या विभागातून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू, जम्मू काश्मीर व झारखंड हे संघ सहभागी होणार आहेत.

भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत, उपाध्यक्ष मनोज यादव, सचिव चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, सचिव प्रताप पगार, पुणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे आदी मान्यवर उद्घाटनावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: