fbpx

वंदे मातरम्’ला विरोधातून काँग्रेसची देशविरोधी मानसिकता -भाजपच्या प्रदेश चिटणीस श्वेता शालिनी यांची टीका

पुणे – सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे, या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकता दाखविली असल्याची टीका भाजपाच्या प्रदेश चिटणीस श्वेता शालिनी यांनी केली.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वंदे मातरम्ला विरोध करणारे वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् म्हणत फासावर चढलेल्या भगतसिंग, राजगुरू यांच्यासारख्या असंख्य हुतात्म्यांचा हा अपमान आहे. त्याबद्दल थोरात यांनी देशाची माफी मागावी, अन्यथा त्यांना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा शालिनी यांनी दिला.

शालिनी पुढे म्हणाल्या, “पंडित नेहरूंचे पणतू राहुल गांधींच्या काळात काँग्रेसची राष्ट्रप्रेमाची व्याख्या कदाचित बदलली असावी. त्यामुळे ‘भारत तेरे तुकडे होंगे’ यांसारख्या देशविरोधी घोषणा देणार्‍या प्रवृत्तिंना ते पाठिंबा देत आहेत. ‘भारत जोडो’ म्हणत यात्रा काढायची आणि दुसरीकडे वंदे मातरम् ला विरोध करायचा, यातून काँग्रेसची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: