… तर शरद पवार ही काय चीज आहे हे देशाला समजले नसते -सुशीलकुमार शिंदे
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा टीका करताना विरोधकांकडून 1978 मधील खंजीर प्रकरणाचा उल्लेख केला जातो. मात्र सुशिलकुमार शिंदे यांनी या प्रकरणावर कौतुकोद्गार काढले. शरद पवार यांनी 1978 ला वसंतदादा यांचं सरकार पाडून स्वत:च सरकार बनवलं नसते. तर शरद पवार ही काय चीज आहे हे देशाला समजले नसते. असे काँग्रेस चे नेते सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.
आज पुणेनवरात्र महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलत होते.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवार साहेब खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र आहेत. पुणे नवरात्र महोत्सव दरवर्षी जे आबा बागुल भरवतात त्यांच्या विषयी सुशीलकुमार शिंदे म्हणाले,आबा बागुल शेजाऱ्याच्या पक्षामध्ये गेले असते. तर केव्हाच आमदार,मंत्री झाले असते . पवार साहेब म्हणाले, कि आता आबा बागुलांना काँग्रेसकडून उमेदवारी द्या.पण आमच्यापेक्षा वरती पवार साहेब पॉवरफुल आहेत. तुम्ही देखील आबांसाठी प्रयत्न करा.
सुशील कुमार शिंदे म्हणाले,माझ्या सत्काराला पवारसाहेब येतील कि नाही .याची भीती वाटली होती .पण ते आले आणि त्यांनी मला आशीर्वाद देखील दिला .लहान माणसांना पकडून त्यांना मोठं करण्याची पवारांची भूमिका आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार त्यांच्या मैत्रीसंदर्भातच व मागच्या निवडणुकी बाबत शिंदे यांनी एक किस्सा सांगितला .
सुशीलकुमार शिंदे म्हणाले,माझी 1971ची निवडणूक 16 हजारात झाली माझ्याकडे पैसे नव्हते पवारांनीच तो खर्च केला .नुसतं आमदार नाही तर पुढे मला पवारांनी मंत्री देखील केलं . राजकारणात डावपेच खेळण्याची कला मला पवारांमुळेच आली नाहीतर मी काय साधा माणूसच होतो.असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
