भगवान गडावर दसरा मेळावा पारंपारिक पद्धतीने होणारच – बाळासाहेब सानप
पुणे : दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे समर्थक व विरोधक यांच्यात दोन गट पडले असून, मुंडे समर्थक गटाने बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले असताना. त्यात आता भगवानगडाच्या पायथ्याला स्वरूप कृती समितीने मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
भगवानगडावर पारंपारिक पद्धतीने दसरा मेळावा यावर्षीपासून सुरू केला जाणार आहे. भगवानगड पारंपारिक मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मेळावा होणारच आहे. आमचा कुठल्याही मेळाव्याला विरोध नाही.अशी माहिती स्वरूप कृती समितीचे बाळासाहेब सानप यांनी दिली. यापूर्वी राजकीय भूमिका भगवानगडावरून ठरल्या जायच्या दिल्ली मुंबई भगवानगडावरून दिसत होती ती नवीन पिढीला दिसावी. या हेतूने मेळाव्याचं वेगळं स्वरूप कृती समितीने मांडलं आहे.
