Monday, October 26, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं शरद पवार असं का म्हणाले..

पुणे:राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण वाचले असतील. आज असा एक प्रसंग पुणे नवरात्र महोत्सवात आला. आज पुणे नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे एकाच व्यासपीठावर बघायला भेटले. या दोघांची मैत्री राजकारणाच्या पलिकडची आहे. त्यांच्या मैत्रीसंदर्भातच आज शरद पवारांनी एक किस्सा सांगितला आहे.

शरद पवार म्हणाले,सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या सांगण्यावरुन पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचे तिकीट मिळवून देतो असे आश्वासन दिले. पण तिकीट मिळवून देऊ शकलो नाही. तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. 

आज पुणे नवरात्र महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, मी त्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवले. आपल्या ज्या काही केसेस असतील तर त्या शिंदेंना द्यायचे ठरले. पुढे त्यापुढील निवडणुकीत शिंदेंना तिकीट मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी मागे बघून पाहिल नाही. असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पुणे नवरात्र महोत्सव पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना मिश्किल टिप्पणी केली. शरद पवार म्हणाले,पुण्यामध्ये जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे देशातील कुठल्याच शहरात दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ही ठाराविक मंडळी असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार ही नावे पुरस्कार मिळवणार्‍या व्यक्तिंच्या यादीत असतात. पुरस्कार ठरवणारे देखील उल्हास पवार, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे लोक असतात .अस पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading