fbpx
Thursday, September 28, 2023
Latest NewsPUNE

तरुण साधकांनी गुरूंना वाहिली सांगीतिक ‘गुरुवंदना’

कलाश्री संगीत मंडळ आयोजित ‘गुरुवंदना’ हा सांगीतिक कार्यक्रम संपन्न

पुणे  : कलाश्री संगीत मंडळ आयोजित ‘गुरुवंदना’ या सांगीतिक कार्यक्रमात तरूण साधकांनी आपले गुरू पं. श्रीकांत देशपांडे व डॉ. सुधाकर मराठे यांना सांगीतिक गुरुवंदना अर्पण केली. हा कार्यक्रम रविवारी दि. २ ऑक्टोबर रोजी औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांच्या तब्बल ३६ शिष्यांनी  गायन, वाद्यवादन कला सादर केली. यावेळी अनुराग जोशी यांनी अतिथी कलाकार म्हणून आपले  बासरीवादन सादर केले, तर  पं. धनंजय मराठे यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई संस्थेचे सचिव बालासाहेब सूर्यवंशी, डॉ. वसंतराव खांडगे आणि साहित्यिक डॉ. दीपक चैतन्य यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख कलाकारांना गायनासाठी  गंगाधर शिंदे, सुरेश फडतरे, संदीप गुरुव, सत्यवान पाटूळे, अभयसिंह वाघचौरे यांनी तर तबल्यासाठी दशरथ राठोड, विक्रम शिंदे, दिगंबर शेडुळे, रघुनाथ राऊत, नंदकिशोर ढोरे, समीर सूर्यवंशी, विष्णु गलांडे यांनी, पखवाजसाठी विद्याधर विरोकर, यांनी टाळ वादनासाठी साथसंगत केली.

कार्यक्रमाचे निवेदन प्राची पांचाळ आणि अभयसिंह वाघचौरे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: