fbpx

२०१४ ला शिवसेनेसोबतच्या युतीबाबत अशोक चव्हाण काही बोललल्याच मला तरी माहिती नाही -शरद पवार

पुणे : राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यावर २०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असतां तर मला समजलं असत . अशोक चव्हाण काही बोललल्याच मला तरी माहिती नाही . अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

शरद पवार यांनी आज पुणे नवरात्र महोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
शरद पवार म्हणाले,राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झालेत पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी. आमच्यासारख्या सिनीयर मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला जे भूमिका मांडतील .त्याने कटुता वाढणार नाही. असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे व शिवसेनेला दिला.

अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकी मध्ये पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि शिवसेना यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार. असे शरद पवार म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण द्याव अशी मागणी आहे. त्यावर पत्रकार यांनी शरद पवारांना विचारले .राष्ट्रवादीची भूमिका काय पवार म्हणाले, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही . निर्णय राज्य सरकार ने घ्यावा.
दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करणार . त्यावर शरद पवार म्हणाले,दसरा मेळावा हा शिवसेनेचा , तो वेगळा पक्ष , राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही .

Leave a Reply

%d bloggers like this: