fbpx

सोनाली सोनावणे आणि केवल वालंज यांच्या सुमधुर आवाजातील ‘राजकुमार’ गाणे घेतंय प्रेक्षकांच्या दिलाचा ठाव

हल्ली रोमँटिक गाण्यांची चलती असताना यांत भर घालत एक आशयघन असे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. प्रेमाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मुलीला तिचा स्वप्नातला राजकुमारच खऱ्या प्रेमाची जाणीव करून तिला योग्य तो सल्ला देतो आणि तिचे आयुष्य अधिक सुखकर करतो असा आशयघन विषय ‘स्वप्न स्वरूप’ निर्मित दिग्दर्शक सचिन आंबात ‘राजकुमार’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत.
विशेष म्हणजे या गाण्यात नवोदित कलाकार शुभम अलई, सुप्रिया तलकर, विनू चव्हाण यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्य करून गाण्याची शोभा द्विगुणित करत आहेत. ‘स्वप्न स्वरूप’ निर्मित सचिन आंबात दिग्दर्शित ‘राजकुमार’ या गाण्यातून कलाकार शुभम अलई सिनेविश्वात पदार्पण करत आहे. दिग्दर्शक सचिन आंबात दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. गायिका सोनाली सोनावणे आणि गायक केवल वालंज यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली. सोनालीने याआधी ‘बहिणाबाई’, ‘माझी बाय गो’ या गाण्यातून तर केवलने ‘रात चांदणं’, ‘नाखवा’ या गाण्यातून मिलियन व्ह्यूज मिळवून प्रेक्षकांच्या मनात घर केलंच आहे. आता त्यांचे हे नवे ‘राजकुमार’ गाणे ही रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यांत शंका नाही. संगीतकार रोहित नानावरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
‘स्वप्न स्वरूप’ निर्मित या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून ‘स्वप्न स्वरूप’ युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून या रोमँटिक आणि आशयघन गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: