fbpx

Pune : शिंदे – फडणवीस आणि अमित शाह यांच्याविषयी सोशल मिडियावरअश्लील मजकूर एकावर गुन्हा दाखल

पुणे; सोशल माध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबतीत अक्षेपार्य अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्याप्रकरणी पुण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

रामदास शिर्के असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.सायबर विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम.पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार,रामदास शिर्के या आरोपीने फेसबुकवर हिंदू एकता ग्रुपवर देशाचे गृहमंत्री अमित शाह,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. अशी तक्रार आमच्याकडे भाजप पुणे शहर सोशल मीडिया अध्यक्ष विनित बाजपेयी यांनी केली. या तक्रारीनुसार आरोपी रामदास शिर्के याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपीचा लवकरात लवकर शोध लागावा.या करीता फेसबुककडे लेखी तक्रारी केली असून त्यांच्याकडून आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: