fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNE

अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये स्वच्छता अभियानाने महात्मा गांधी जयंती साजरी

पिंपरी : जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मिडीयम स्कुल, लिटल फ्लॉवर विद्यालय व भारतीय विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने गांधी जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पूजा पोटपल्लीवार, लिटल फ्लॉवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, ज्योती फर्तीयाल, शिक्षिका कविता मुदलीयार, नीलम मेमाणे, सुमित्रा कुंभार, कीर्ती शिंपी, तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. 

 विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट कथन केली आणि रघुपती राघव राजाराम व सत्यम शिवम सुंदरम् प्रार्थना सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले.         

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ राखला पाहिजे. त्यामुळे मन नेहमी प्रसन्न राहते. संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी अहिंसा व सत्य पालन यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नेहमी खरे बोलावे, म्हणजेच गांधीजींच्या सत्य या गुणाचे आचरण करावे. 

संस्थेतील शिक्षिकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कविता मुदलीयार, नीलम मेमाणे यांनी, तर शिक्षिका सुमित्रा कुंभार यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: