fbpx

होंडा इंडिया फाउंडेशनच्या मोबाइल मेडिकल युनिटद्वारे (एमएमयू) भारतातील सहा लाख लोकांना लाभ

गुरुग्राम : भारताला अधिक निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी आपल्या स्त्रोतांचा वापर करण्याच्या हेतूने होंडा इंडिया फाउंडेशनने (एचआयएफ) आज आपल्या मोबाइल मेडिकल युनिट्सच्या (एमएमयू) माध्यमातून गेल्या सहा वर्षांत भारतातील सहा लाख लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा जास्त सुलभपणे उपलब्ध करून दिल्याचे जाहीर केले आहे.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्यसेवेची गरज लक्षात घेऊन होंडाने २०१६ मध्ये मोबाइल मेडिकल युनिट सेवेची सुरुवात केली. सध्या ही सेवा हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश, एचआयएफचे ५ एमएमयू आणि १ एसएमयू (स्टॅटिक मेडिकल युनिट) येथे दिली जात असून त्याद्वारे दुर्गम भागात राहाणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी प्राथमिक, प्रतिबंधात्मक, निदानसेवा आणि रिफलर आरोग्य सेवा दिली जाते.

या उपक्रमाच्या यशाविषयी होंडा इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणे ही महत्त्वाची समस्या असल्याचे लक्षात घेत होंडा इंडिया फाउंडेशनने ती सोडवण्यासाठी ठाम पावले उचलत परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या. आमची मोबाइल मेडिकल युनिट सेवा लोकांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या वेळेवर सोडवण्यासाठी मदत करते. यापुढेही आम्ही आपला समाज अधिक निरोगी, सर्वसमावेशक बनवण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत प्रयत्न करत राहू.’

होंडा इंडिया फाउंडेशनच्या मोबाइल मेडिकल युनिट्सची (एमएमयू) वैशिष्ट्ये

 

  • रिमोट अक्सेस – मोबाइल मेडिकल युनिट्सच्या माध्यमातून हरियाणा, गुजरात, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील दुर्गम गावात राहाणाऱ्या लोकांना घरपोच सेवा दिली जाते.
  • क्लिनिक ऑन व्हील्स – निदानासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असलेल्या या मोबाइल मेडिकल व्हॅन्सबरोबर डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट आणि सामाजिक संरक्षण अधिकारी यांचा समावेश असलेली वैद्यकीय टीम असते.
  • वैद्यकीय तपासणी – ग्रामीण भागातील सुधारित आरोग्यसेवा आणि वेळेवर तपासणीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे तसेच गंभीर आजारांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे प्रमाण वाढले.
  • परवडणारे – ही युनिट्स तपासणी आणि औषधे यांसारख्या सेवा वर्षभर मोफत पुरवतात.
  • घरी भेट आणि इतर सुविधा – मोबाइल मेडिकल युनिटला भेट देणे शक्य नसलेल्या रुग्णांसाठी हे युनिट घरपोच सेवा देते. या युनिट्सद्वारे रुग्णांना इतर हॉस्पिटल्समध्ये जायची गरज पडल्यास वाहतूक सेवाही दिली जाते.

Leave a Reply

%d bloggers like this: