fbpx

स्कोडा ऑटोने राखला प्रगतीचा वेग कायम, सप्टेंबरमधील विक्रीची घौडदौड सुरूच

मुंबई – भारतात सर्वात भव्य वर्षाची नोंद केल्यानंतर लगेचच स्कोडा ऑटो इंडियाने सप्टेंबर 2022 मध्ये 3,543 गाड्यांची विक्री करून आणखी एक नवा विक्रम नोंदवला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये 3027 गाड्या विकल्या गेल्या होत्या. मात्र, यंदा लोकलायझेशन आणि स्थानिक पातळीवर उत्पादनाला चालना देत या झेक कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 17 टक्के वाढ नोंदवली आहे.

स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर पेट्र सोल्क म्हणाले, “नुकताच आम्ही सर्वात भव्य वर्षाचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आमच्या सर्व टीम्स आणि आमचे डीलर भागीदार या साऱ्यांसाठीच हे फार मोठे यश आहे. उत्पादनांच्या बाबतीत सांगायचे तर, कुशाक आणि स्लाविया या गाड्या सातत्याने विक्रीमध्ये भर घालत आहेत. ऑक्टाविया आणि सुपर्ब या आमच्या डी विभागातील गाड्याही आपापल्या विभागात आघाडीवर आहेत. ग्राहकसमाधान अधिक वृद्धिंगत करणे आणि भारतभरात आमचे कस्टमर टचपॉईंट्स अधिक वेगाने वाढणे यावर आता आम्ही भर देत आहोत.”

डिसेंबर 2021 मध्ये स्कोडा ऑटो इंडियाचे 175 टचपॉईंट्स होते आणि आता ही संख्या 205 हून अधिक झाली आहे. शिवाय, 2022 मध्ये ही संख्या 250 वर नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. वर्षाकाठी सातत्याने कंपनीची प्रगती होत आहे आणि यामागील मुख्य कारण आहे MQB-A0-IN व्यासपीठाचे 95 टक्के लोकलायझेशन. याच व्यासपीठावर कुशाक एसयूव्ही आणि स्लाविया या सेडान्स तयार करण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवरील घटक आणि संशोधन तसेच स्थानिक पातळीवरच उत्पादने तयार केली गेल्याने गाडी बाळगण्याचा खर्च 0.46 प्रति किमी. इतका कमी झाला आहे. त्यामुळे अधिकाधिक नवे ग्राहक आकर्षित होत आहेत आणि त्यामुळे विक्रीतही वाढ होत आहे.

स्कोडा ऑटोसाठी सध्या भारत ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी बाजारपेठ आहे. जर्मनी आणि स्कोडाची मातृभूती झेक रिपब्लिकनंतर भारताचा क्रमांक आहे. 2022 च्या पहिल्या तीन तिमाह्यांमध्ये या कंपनीने आपल्या सर्व शोरूम्सना पूर्णपणे डिजिटल करण्याची भव्य मोहीम हाती घेतली होती. यातील परस्परसंवादी सुविधांमुळे ग्राहकांचा गाडी निवडण्याचा आणि खरेदी करण्याचा अनुभव अधिक वृद्धिंगत झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: