fbpx

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे परिचारिका आणि महिला डॉक्टरांचा सन्मान 

पुणे :  कोविड काळासह वर्षभर रुग्णांची सेवा करणा-या डॉक्टरांप्रमाणे परिचारिका देखील समाजासाठी मोलाचे कार्य करीत असतत. त्यामुळे सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात महिला डॉक्टर्स व परिचारिकांना सन्मान करण्यात आला. कोविड काळात व कोविड नंतर आलेल्या आरोग्यविषयक संकटांच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सेवा देणा-या महिला शक्तीला यानिमित्ताने मानवंदना देण्यात आली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात कमला नेहरु रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. संजय अग्रवाल, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, रमेश पाटोदिया, विशाल सोनी आदी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करणा-या डॉ.लिली जोशी, डॉ.मिनाक्षी भोसले, डॉ.सुप्रिया भाटकर, डॉ.लता प्रकाश आदींचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि महावस्त्र देऊन महिला डॉक्टर्स व परिचारिकांचा गौरव करण्यात आला.

डॉ.संजय अग्रवाल म्हणाले, महिला डॉक्टर्स व परिचारिकांचे समाजातील योगदान मोठे आहे. रुग्णांना बरे करण्यामध्ये डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांचे देखील मोठे योगदान असते. त्यामुळे यापुढेही रुग्णांची सेवा करण्याची संधी देवीने सर्वांना द्यावी, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, कोविड काळात महिला डॉक्टर्स व परिचारिका स्वत:चे घर सांभाळून रुग्णसेवा करीत होत्या. कोविड संकट स्वत:च्या आरोग्यावर असूनही त्यांनी रुग्णसेवा केली. त्यामुळे त्यांच्या कार्य खूप मोठे आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: